Mumbai Crime : भिंतीवरून चोरी करणाऱ्या चोरट्याला गुजरातमधून अटक - मुंबई क्राईम
मुंबई - अनेक दिवसांपासून भिंतीवर चढून चोरट्यांनी लाखोंचे सोने, चांदी व मौल्यवान वस्तू चोरून नेल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. मालाडला ७ फेब्रुवारी तक्रारदार बाहेर गेले असता, त्यांच्या घरातून १४ लाख ८३ हजार रुपये किमतीचे सोने, चांदी व रोख रक्कम चोरीस गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपी अब्दुल इद्रिस शेख (43) याला गुजरातमधून अटक केली. आरोपी सोनार मनोज जैन (49) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी अब्दुल इद्रिस शेख (43) याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि सुमारे 15 लाख 15 हजार 500 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. मालाड पोलिस ठाणे येथील 3 आणि बांगुनगर पोलिस ठाण्यात 1 गुन्हे उघडकीस आले आहेत. सध्या पोलीस आरोपीचा मुंबईत शोध घेत असून त्याने कोणत्या भागात चोऱ्या केल्या आहेत. आरोपीची पद्धत अशी होती याचाच तपास करत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST