Varsha Gaikwad on Womens Day : राज्यातील आदर्श शाळांमध्ये शौचालय, ग्रंथालय, स्वसंरक्षणाचे धडे; शिक्षणमंत्र्यांची माहिती - वर्षा गायकवाड महिला दिन कार्यक्रम 2022
मुंबई - जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ( International Womens Day ) शालेय विद्यार्थिनींसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येणार असून विद्यार्थिनींच्या शारीरिक स्वच्छता, आरोग्य आणि स्व संरक्षणावर भर दिला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. ( Minister Varsha Gaikwad on Womens Day Programme ) या कार्यक्रमांमध्ये व्यक्तिगत विकास प्रशिक्षण, स्वच्छतागृहे, मासिक पाळी दरम्यान कशी स्वच्छता राखावी, डोक्याची काळजी कशी घ्यावी, सँनिटरी नॅपकिन वेंडीग मशीन वितरण योजना, ग्रंथालय तसेच स्वसंरक्षणाचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST