महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : भायखळा परिसरातील कपड्याच्या कारखान्याला भीषण आग; आगीवर नियंत्रण - झकेरिया औद्योगिक वसाहत

By

Published : Mar 3, 2022, 2:29 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

मुंबईतील भायखळा परिसरातील जकारिया इंडस्ट्रिलय इस्टेटमधील कपड्याच्या कारखान्याला आग लागली. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली, असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. मुंबईच्या भायखळा गोदरेज प्लॅनेट जवळील जकारीया इंडस्ट्रीयल इस्टेटमधील कपड्यांच्या कारखान्याला दुपारी १ वाजून २० मिनिटांनी आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ८ फायर इंजिन, ५ जम्बो टॅंकर पाठवण्यात आले. कपड्यांच्या कारखान्याला आग लागली असल्याने आग पसरली. त्यामुळे ही आग लेव्हल २ ची जाहीर करण्यात आली. आग विझवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाचे जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. ही आग दुपारी २.४५ वाजता विझवण्यात आली. आग का लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत कोणीही जखमी न झाल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळाली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details