महाराष्ट्र

maharashtra

Pawana River Pollution : पवना नदीत तेलाचे तवंग; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

By

Published : Apr 8, 2022, 5:04 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

पिंपपी चिंचवड (पुणे) - पिंपरी चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या पवना नदीच्या पाण्यावर कालपासून तेलाचा तवंग आला आहे. मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले तर पिंपरी चिंचवडकरांच्या आरोग्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. काल पॉवर जनरेशनमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे पवना धरणातून पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला होता. त्याच पॉवर जनरेशनची दुरुस्ती करताना ऑईलचे वापर करण्यात आले. तेच ऑईल पाण्यात मिक्स झाल्याचे धरण प्रशासनाचे म्हणणे आहे. हे तेल काही तासांत वाहून जाईल, असा दावाही त्यांनी केला आहे. पण हा दावा फोल ठरला तर शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान तर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details