VIDEO : बैरुतमध्ये दोन भीषण स्फोट, १००हून अधिक ठार; थरार कॅमेऱ्यात कैद..
लेबॅनॉन देशाची राजधानी असलेल्या बैरुतमध्ये काल दोन भीषण स्फोट झाले. या स्फोटांमध्ये १००हून अधिक लोक ठार, तर चार हजारांहून अधिक लोक जखमी झाले. या स्फोटांची भीषणता पाहता, हा आकडा वाढण्याचीही शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तज्ज्ञांच्या मते अमोनियम नायट्रेट आणि फटाक्यांची दारु हे या स्फोटांचे मूळ कारण असू शकते. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र हे स्फोट एखादा हल्ला असण्याचीही शक्यता व्यक्त केली आहे...