VIDEO : श्री क्षेत्र जोतिबा येथील उन्मेष अश्वाने घेतला अखेरचा श्वास - दख्खनचा राजा श्री जोतिबा
कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवसेवक उन्मेष अश्वाने आज बुधवारी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन दिवसांपासून तो आजारी होता मात्र उपचार सूरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. गेल्या अनेक वर्षांपासून उन्मेष नावाच्या या अश्वाने जोतीबाची सेवा केली आहे. जोतिबा पालखी पासून धूपआरती वेळी सुद्धा हा पुढे असायचा. मात्र त्याने आज आता अखेरचा श्वास घेतल्याने भक्तांमधून हळहळ व्यक्त होत आहे. याची माहिती समजताच आजूबाजूचे भक्त मोठ्या संख्येने उन्मेषला अखेरचा निरोप द्यायला जमले होते. सायंकाळी त्याची ट्रॅक्टर ट्रॉलीमधून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी अंत्यदर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST