एका वर्षात दोनशे शेत रस्ते करणार - मंत्री गुलाबराव पाटील - nashirabad primary Health center inauguration Gulabrao Patil
जळगाव - नशिराबादला प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे पालकमंत्री गुलाबराव पाटलील यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये जवळपास शंभर रस्त्यांचे काम मी केले आहे. हे सर्व शेत रस्ते मातोश्री पानंद रस्ते योजनेतून आहेत. एका वर्षात शेतकऱ्यांसाठी मी दोनशे रस्ते करणार, असे वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामुळे नशिराबाद परिसरातील रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. हे उपकेंद्र सव्वा कोटी रुपये निधीतून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या माध्यमातून उभारण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा रंजना पाटील, जामनेरच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन, जिप उपाध्यक्ष लालचंद पाटील, अतिरिक्त कार्यकारी मुख्य अधिकारी मोहन साहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST
TAGGED:
Gulabrao Patil in nashirabad