Burn sugarcane in Nashik : गोदाकाठी 20 एकर ऊस जळून खाक ; निफाड तालुक्यातील शिंगवे शिवारातील घटना
निफाड (नाशिक) : निफाड तालुक्यातील शिंगवे शिवारातील (Sugarcane was burnt in Shingwe Shivara) कोरडे मळा येथील दहा ते बारा शेतकऱ्यांचा 20 एकर (20 acres of sugarcane burnt) ऊस जळून खाक झाला. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. तसेच गोदाकाठ भागांमध्ये मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. स्थानिक शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने आग भडकत गेल्याने आगीमध्ये जवळजवळ 20 एकर ऊस जळून खाक झाला आहे. ही आग विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा (Fire due short circuit power lines) अंदाज व्यक्त केला जात आहे. जवळपास चार ते पाच तास ऊसाचे शेत जळत होते. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास आग आटोक्यात आली. परंतु तरी देखील या आगीमध्ये वीस एकर ऊस जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.