महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस-महंत अनिकेत देशपांडे - Gurupournima

By

Published : Jul 13, 2022, 11:07 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

नाशिक - गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा,ज्ञानाची पौर्णिमा आणि सर्वश्रेष्ठ पौर्णिमा आहे,आई आणि वडील यांच्यानंतर जो सदा सर्वदा पूजनिय असतो तो म्हणजे गुरु,या आपल्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा,ज्या गुरूंनी आपल्याला ज्ञानामृत दिलं या सृष्टीमध्ये समाजामध्ये सन्मानाने जगण्यासाठी ज्यांनी आपल्याला प्रवृत्त आणि तयार केलं, विद्वान केलं अशा थोर व्यक्तीचे आभार मानण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा (Special on Gurupourni). या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना विशेष आदर द्यावा त्याचबरोबर त्यांचे पाद्यपूजा करावे त्यांना वस्त्र अलंकार प्रदान करावी, आणि आपल्या गुरूंना जे योग्य आहे जे आवश्यक आहे ते त्यांना आपल्या शक्तीप्रमाणे अर्पण करावं, आणि भरभरून आशीर्वाद घ्यावे,त्याचबरोबर पौर्णिमा हा दिवस चंद्रा संबंधी आहे,यापौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करावी, दूध आणि पाणी यांच दान द्यायचं,तांदुळाची खीर बनवायची त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा,अशी विविध गुरुपौर्णिमा साजरी करून या पुण्याच्या लाभ घ्यायचा असं महंत अनिकेत शास्त्री देशपांडे (Mahant Aniket Deshpande) यांनी सांगितलं आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details