महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Bullock Cart Race Pune : पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा घुमला भिररर्रचा आवाज; 'आंनद गगनात मावत नाही आहे' - bullock cart race

By

Published : Feb 11, 2022, 1:00 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST

पिंपरी (पुणे) - सर्वोच्च न्यायालयाने अटी शर्थींसह बैलगाडा शर्यतींना परवानगी ( Supreme Court Permission to bullock cart race ) दिल्यानंतर पुण्यात ( Bullocks Race Pune ) आज पहिल्यांदाच घाटात धुरळा उडाला. आंबेगाव आणि मावळ तालुक्यात दोन दिवस शर्यत पार पडणार आहे. लांडेवाडीच्या घाटात सातशे तर नाणोलीच्या घाटात साडे तीनशे बैलजोड्या धावणार आहेत. आठ वर्षाची प्रतीक्षा संपल्याने बैलगाडा शौकिनांमध्ये उत्साहाचं वातावरण पहायला मिळालय. न्यायालयीन लढा जिंकून, तब्बल आठ वर्षानंतर अखेर घाटात बैलगाड्यांचा धुरळा उडाला. आपल्या मुलासमान निगा राखलेल्या सर्जा-राजाची जोडी घाटात धावली अन बैलगाडा मालक, चालक अन शौकिनांच्या आनंदाला पारावर उरला नाही. पुण्यातील शिरूर लोकसभेसाठी हा सर्वात महत्वाचा विषय मानला जातो. म्हणूनच शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव ( Former MP Shivaji Adhalrao on Bullocks Race ) यासाठी लढा देत होते. सशर्त परवानगी मिळताच त्यांनी शर्यतीचे आयोजन केले. त्यांच्याशी संवाद साधलाय ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details