महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Fire Broke Out : भिवंडीतील डाईंग कंपनीला भीषण आग, दोन तासांनंतर आग आटोक्यात

By

Published : Feb 17, 2022, 8:15 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST

ठाणे - भिवंडीत आगीचे सत्र सुरुच ( Fire Broke Out ) असून गुरुवारी (दि. 17 फेब्रुवारी) पहाटे एका डाईंग कंपनीमध्ये भीषण आग लागली. या घटनेत कंपनी जळून खाक झाली आहे. ही घटना भिवंडी शहरालागतच्या मीठपाडा परिसरात असलेल्या धारिया डाईंग कंपनीत ( Dyeing Company ) घडली आहे. टेरेसवर आग लागून दोन मजली कंपनी जळून खाक - भिवंडी लगतच खोणी ग्रामपंचायत हद्दीतील मीठपाडा भागात कपड्यांवर प्रकिया करणाऱ्या अनेक डाईंग कंपन्या आहेत. त्यातच धारिया डाईंग कंपनीला आज ( गुरुवार ) पहाटेच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 3 बंब घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. विशेष म्हणजे धारिया डाईंगच्या टेरेसवर बनवण्यात आलेल्या अनधिकृत पत्र्याच्या शेडमध्ये सुरुवातीला आग लागल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ही आग पसरत दुसऱ्या व पहिल्या मजल्यापर्यंत पोहचली. या कंपनीत मोठ्या प्रमाणावर साठवणूक ठेवलेले लाखोंचे कापड, धागे, मशीनरी व इतर साहित्य आगीत जळून खाक झाले. घटनास्थळी कुलिंगचे काम सुरू - दुसरीकडे अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर या भीषण आगीवर नियंत्रण मिळविले. सध्या घटनास्थळी कुलिंगचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. तर सुदैवाने दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details