VIDEO : दक्षिण गोवा इथे नेमका काय निकाल आला? पाहा, सविस्तर... - दक्षिण गोवा आणि इथे नेमका काय निकाल आला?
गोवा - दक्षिण गोव्यात एकूण 21 जागांपैकी 10 जागांवर भाजपला यश मिळवता आले आहे. मात्र, या भागात काँग्रेसला मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. सुदिन ढवळीकर यांनी सुद्धा हा निकाल धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. इथे रिव्हॉल्यूशनरी गोवन्स पक्षाने मुसंडी मारत दोन जागांवर बाजी मारली आहे. संपूर्ण दक्षिण गोव्यात जवळपास 10 ते 15 टक्के मते घेतली आहेत. त्यामुळे आजचा निकाल धक्कादायक मानला जात आहे. शिवाय याच दक्षिण गोव्यातील महत्वाचे नाव होते ते उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांचे मात्र त्यांचा धक्कादायक पद्धतीने दिगंबर कामत यांनी पराभव केला. त्यामुळे अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने घेतलेला आढावा
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST