Weightlifter Sanket Sargar : उदरनिर्वाहासाठी पैसे नसतानाही वडिलांनी ट्रेनिंग सुरु ठेवले; संकेतच्या बहिणीने सांगितला संघर्षमय अनुभव - Sanket Sargar won medal
सांगली - माझ्या वडिलांनी आमच्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आमचा सर्व उदरनिर्वाह चाहाच्या टपरीवर चालते. कधी पैसे नसले तर आमच्या प्रशिक्षकांनी आम्हाला पैसे दिले. मात्र, माझ्या आई-वडिलांनी कधीही आमचे ट्रेनिंग बंद केले नाही असे भारतीय वेटलिफ्टर संकेत सरगर ( Weightlifter Sanket Sargar ) यांची बहीण काजल सरगर ( Kajal Sargar ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या महिन्यात, काजल सरगरने चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये ( Khelo India Youth Games ) पहिले सुवर्णपदक जिकंले ( Kajal Sargar Gold Medalist ) होते. मी राज्यासाठी मेडल जिकंले तर, भावाने देशासाठी मेडल जिकंले. संपुर्ण महाराष्ट्राला माझ्या भावाचा गर्व असल्याचे देखील त्यांनी सांगितले. नुकतेच बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ( Birmingham Commonwealth Games ) संकेत सरगर यांनी भारताला पहिले रौप्यपदक पदक ( Sanket Sargar won silver medal ) मिळवून दिले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST