Bacchu Kadu News : आदिवासींची आमदार बच्चू कडू यांनी घेतली भेट, सुविधा पुनर्वसनाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा - सुधीर मुनगंटीवार
मुंबई : आदिवासी पाड्यात अनेक समस्यांचे वास्तव आजही आहे. मुंबईच्या बोरिवलीतील राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासींची आमदार बच्चू कडू यांनी भेट घेतली. आदिवासींच्या प्रश्नांवर नेहमीच बच्चू कडू हे जीवतोडुन काम करतात. आज आदिवासींची भेट घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन आदिवासींच्या मूलभूत सुविधा आणि पुनर्वसन याबाबत चर्चा केली. यावेळी बच्चू कडू म्हणाले की, आदिवासी पाड्यात पाण्याची लाईन नाही, मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. राष्ट्रीय उद्यानाच्या नावाखाली ही सुविधा बंद केली आहे, आज मी अधिकाऱ्यांशी बोललो, सुधीर मुनगंटीवार यांच्याशीही बोललो, उच्च न्यायालयाच्या निर्णयात मुलभूत सुविधा देता येत नाहीत, हे चुकीचे आहे, असे बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू यांनी आदिवासी प्रश्नांवरही प्रतिक्रिया दिली आहे.