VIDEO : अवैध दारूविक्री विरोधात आमदारांची धाड.. - आमदार टेकचंद सावरकर
नागपूर पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे नागपूरच्या मौदा पोलीस स्टेशन हद्दीतीलअवैध धंद्यांवर लोकप्रतिनिधींना धाड टाकण्याची वेळ आली आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदारसंघाचे आमदार टेकचंद सावरकर यांनी सोमवारी रात्री 'गब्बा' नावाच्या ढाब्यावर रात्री दीड वाजताच्या सुमारास धाड टाकली. तेव्हा त्या ठिकाणी दारू विक्री सुरू होती. त्यामुळे आमदार टेकचंद सावरकर यांनी स्वतः त्या ठिकाणातून फेसबुक लाईव्ह करत हा सर्व प्रकार उघडकीस आणला. या अवैध धंद्याकडे खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार खराबे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.