Pune Metro : पुणे मेट्रोचे श्रेय कर्मचारी अन् पुणेकरांना - ब्रिजेश दीक्षित - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पुणे - पुणेकरांसाठी बहुप्रतिक्षित असलेल्या मेट्रोचे आज (दि. 6 मार्च) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यानंतर मेट्रोचे एम.डी. ब्रिजेश दीक्षित ( MD Brijesh Dixit ) म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी या कामाचे कौतूक केले. दीक्षित यांनी कामाचे श्रेय मेट्रोसाठी दिवस रात्र काम करणाऱ्या कामगारांना दिले. कोरोना काळात दिवस रात्र एक करत कर्मचाऱ्यांनी मेट्रोसाठी काम केले. तसेच नंतरच्या काळात रस्ते अडवत कर्मचाऱ्यांनी काम केली. यात पुणेकरांनीही चांगली साथ दिली. त्यामुळे मेट्रो सुरू झाली आहे. मेट्रोचे उर्वरित काम हे डिसेंबर, 2022 पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST