भाजपला मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - धनंजय मुंडे - सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
बारामती : आमच्या शक्तीपीठावर हल्ला करून काहीतरी यश मिळेल असं भाजप विचारधारेला वाटतंय. मात्र भाजपला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा घणाघात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बारामतीत केला. मंत्री मुंडे यांनी आज बारामती येथील शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी पाडव्यानिमित्त भेट दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पुढे ते म्हणाले की, आमचे दैवत असलेल्या पवार साहेबांना भेटण्यासाठी आम्ही दरवर्षी येत असतो. असं सांगत शरद पवारांना भेटल्यावर एक ऊर्जा मिळते. साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाल्यासारखे वाटते असे मुंडे म्हणाले. तसेच भाऊबीजेच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या नसल्याचेही मुंडे म्हणाले. ज्या वेळी शुभेच्छा मिळतील त्या वेळी आपणाला कळवले जाईल, अशी मिश्किल टिप्पणी मुंडे यांनी केली.