नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उघडले पंढरीरायाचे दार... पाहा विठ्ठलाचे सुंदर रुप
पंढरपूर (सोलापूर) - आज आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर आज विठ्ठल रुक्मिणी मातेचे मुखदर्शन भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. दररोज दहा हजार भाविकांना पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ मिळणार आहे. शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात आणि मंदिरात लक्षावधी तुळशीच्या पानांची आरास करण्यात आली आहे. पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी सुमारे अडीच टन तुळशी पाना फुलांचा वापर केला आहे.