VIDEO : अमरावतीमधील हिंसाचार पूर्वनियोजित - यशोमती ठाकूर - अमरावती हिंसाचार
अमरावती - शहरातील हिंसाचारानंतर महाराष्ट्र सायबर क्राईमचे काही अहवाल अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हाती आले आहे. मात्र, हे अहवाल अतिशय धक्कादायक आहे. तर अमरावती मध्ये झालेला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता अशी खळबळजनक माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली. तर काही वेळ इंटरनेट सुरु झाल्यानंतर 4 हजार ट्विट झाले हे आक्षेपार्ह असल्याचेही या अहवालात दिसून येत आहे असेही मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.