कोल्हापुरातील एसटी वाहतूक सलग दुसऱ्या दिवशीही ठप्प, कर्मचारी म्हणाले... - bombay hc on st employees strike
कोल्हापूर - आज सलग दुसऱ्या दिवशीही कोल्हापुरातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील सर्वच एसटी डेपो बंद आहेत. एसटी महामंडळ बरखास्त करून त्याचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कालच याबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरीही कोणी आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न करत असेल तर कारवाई करण्यात येईल, अशा पद्धतीचे संकेत परिवहन मंत्र्यांनी दिले आहेत. तरीही आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम असून त्यांचा संप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील एसटी वाहतुकीबाबत 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने आढावा घेतला.