Kangana Ranaut Statement Recorded Mumbai: मुंबईच्या खार पोलीस ठाण्यात कंगना रनौतने नोंदविला जबाब - कंगना खार पोलिस स्टेशनमध्ये
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत आज खार पोलिस स्टेशनमध्ये आली होती. शीख समाजाबद्दल केलेल्या अक्षेपार्ह्य टिप्पणी प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ( Sentiments of the Sikhs were hurt ) होता. या प्रकरणी कंगनाने मुंबई हायकोर्टात ( Kangana Ranaut High Court Appeal ) अर्ज करुन एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावर कोर्टाने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन जबाब नोंदवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज (गुरुवार) कंगना खार पोलिस स्टेशन ( Kangana At Khar Police Station ) येथे आली आणि तिने जबाब नोंदवला ( Kangana Ranaut Statement Recorded ) आहे. यासंबंधीची माहिती तिचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी दिली आहे.