VIDEO: राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले - कोल्हापूर राधानगरी धरण
कोल्हापूर - जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले आहेत. आज (बुधवारी) सकाळच्या सुमारास 3 आणि 6 नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडला, तर दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास आणखी दोन असे एकूण चार दरवाजे उघडले आहेत. त्यातून सुमारे 7112 क्यूसेक हुन अधिक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. अजूनही जिल्ह्यासह धरण क्षेत्रात पावसाची उघडझाप सुरूच आहे. त्यामुळे धरणाचे स्वयंचलित दरवाजे सुद्धा उघडून बंद होणे सुरू आहे. दरम्यान, धरणातून पांढऱ्या शुभ्र स्वच्छ पाण्याचा सुरू असलेला विसर्ग आणि त्यातून उडणाऱ्या तुषारांमुळे एक विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे.