अमरावती-अचलपूर मार्गावर पोलिसांची नाकेबंदी - अमरावती पोलीस बातमी
अमरावती - जिल्ह्यात कोरोनाबधितांची रुग्णसंख्या लक्षात घेता २२ मेपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे काम नसताना घराबाहेर पडू नका, असे आवाहन जिल्हा प्रशासणाच्या वतीने केले जात आहे. असे असतानाही अनेक लोक आपली वाहने घेऊन घराबाहेर पडत आहे. या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी अमरावती अचलपूर मार्गावर अचलपूर चौफुलीवर पोलिसांचा मागील काही दिवसांपासून कडक बंदोबस्त आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते आहे. जे लोक विनाकारण फिरतात आशा लोकांवर कारवाई देखील केली जात आहे.