पहाटेचा शपथविधी : ऐका, 'त्या' शपथविधीविषयी काय बोलून गेले अब्दुल सत्तार!
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यावर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने अजित पवार यांना सोबत घेऊन थोडा खेळ खेळला होता. मात्र शरद पवार यांनी तो खेळ 24 तासांच्या आत हाणून पाडला. राष्ट्रपती राजवट अनेक महिन्यांनंतरही काढता आली नसती. मात्र या घटनेमुळे पहाटे चार वाजता राष्ट्रपती राजवट हटविली गेली असे सत्तार म्हणाले. राजकीय खेळ कसा खेळावा हे शरद पवार आणि अजित पवार यांना चांगलंच माहिती आहे असेही सत्तार यावेळी म्हणाले.