VIDEO : नाना पटोलेंनी ढोल-हलगीच्या तालावर धरला ठेका, पाहा बंजारा नृत्य - नाना पटोले जालना दौरा न्यूज
जालना - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पटोले यांचा जालना शहरात आणि वाटूर येथे काँगेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर पटोले यांनी मंठा येथे 'काँगेस आपल्या दारी' या कार्यक्रमाला हजेरी लावली. काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी आयोजीत केलेल्या या कार्यक्रमात पटोले यांचे बंजारा समाजाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्यात बंजारा समाजबांधवांनी पारंपारीक नृत्य सादर करत आणि ढोल वाजवत पटोले यांचे स्वागत केले. या स्वागत सोहळ्यात पटोले यांनी स्वतः हलगी वाजवली. शिवाय, सर्वांसोबत पटोले यांनीही ठेका धरला.