महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

यवतमाळमध्ये कोविड लसीच्या कुपीवरील गणपती घेतोय लक्ष वेधून

By

Published : Sep 12, 2021, 8:14 PM IST

Updated : Sep 12, 2021, 8:55 PM IST

यवतमाळ - महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम असताना दारव्हा येथील ओम गणेश मंडळाची कोविड लसीवर विराजमान इवलेसे बाप्पा लक्ष वेधून घेत आहे. दारव्हा येथील ओम गणेश मंडळ दरवर्षी काहीतरी वेगळे सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबवितात. यंदा कोवीड लसीच्या बाटलीवर विराजमान गणपती बाप्पा कोरोना जनजागृती करीत आहे. मूर्तीकार महेश दंडे यांनी साकारलेली केवळ नऊ इंच उंचीची सुबक गणेश मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. नायब तहसीलदार सुनील सरागे यांचे हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी आणि नागरिकांसाठी लसीकरण शिबीर राबविले जात होते. याआधी मंडळाने आत्महत्या,वृक्षरोपन,स्त्रि भ्रुण हत्या,बेटी बचाओ बेटी पढाव, वृद्धाश्रम आदी संकल्पना राबविल्या आहेत.
Last Updated : Sep 12, 2021, 8:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details