चेंबुरमध्ये मायलेकीने बनविला दिवाळीत किल्ला; प्रतापगडासह साकारले ग्रामीण जीवन
मुंबई - दिवाळीत लहान मुले फटाके फोडण्याबरोबर किल्ले तयार करण्याचा आनंद लुटतात. चेंबूर येथील आसावरी दळवी यांनी आपल्या मुलीसोबत एक किल्ला तयार केला आहे. सिंहासनावर आरुढ छत्रपती शिवाजी महाराज, बाजूला मावळे आणि गडाखाली एका छोट्याशा गावाचा हुबेहूब सुंदरसा देखावा त्यांनी तयार केला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील जीवन कशा प्रकारे असते हे दाखविण्यात आले आहेत. प्रतापगडाची कलाकृती त्यांनी साकारली आहे.