महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सवानिमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

By

Published : Aug 15, 2021, 10:06 AM IST

आळंदी/पुणे - देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात पहाटे समाधीवर दुग्धअभिषेक करत महाआरती करण्यात आली. तसेच आज मंदिराच्या विना मंडप व समाधी गाभाऱ्यात विविध रंगाच्या फुलमाळांनी सजविण्यात आले आहे. समाधी मंदिरातील दृश्य अत्यंत विलोभनीय असून प्रत्येक विशेष दिनानिमित्ताने माऊलींच्या गाभाऱ्याला फुलांची आकर्षक सजावट केली जाते. माऊली मंदिरात केलेली ही सजावट पाहण्यासाठी दरवर्षी असंख्य भाविक याठिकाणी दाखल होत असतात, परंतु यावर्षी कोरोनाचं सावट असल्यामुळे यंदा भाविकांना घरातूनच ऑनलाइन दर्शन घ्यावे लागत आहे. देवस्थाने बंद असले तरी मंदिरांमध्ये पूजा, फुलांची आरास अशा विधी नित्यनेमाने सुरू असल्याची माहिती देवस्थानचे व्यस्थापक माऊली वीर यांनी दिली आहे.- देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात पहाटे समाधीवर दुग्धअभिषेक करत महाआरती करण्यात आली. तसेच आज मंदिराच्या विना मंडप व समाधी गाभाऱ्यात विविध रंगाच्या फुलमाळांनी सजविण्यात आले आहे. समाधी मंदिरातील दृश्य अत्यंत विलोभनीय असून प्रत्येक विशेष दिनानिमित्ताने माऊलींच्या गाभाऱ्याला फुलांची आकर्षक सजावट केली जाते. माऊली मंदिरात केलेली ही सजावट पाहण्यासाठी दरवर्षी असंख्य भाविक याठिकाणी दाखल होत असतात, परंतु यावर्षी कोरोनाचं सावट असल्यामुळे यंदा भाविकांना घरातूनच ऑनलाइन दर्शन घ्यावे लागत आहे. देवस्थाने बंद असले तरी मंदिरांमध्ये पूजा, फुलांची आरास अशा विधी नित्यनेमाने सुरू असल्याची माहिती देवस्थानचे व्यस्थापक माऊली वीर यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details