दोन पिढ्यातील अंतर कमी करणारी 'बाप बीप बाप' वेब सिरीज - शिल्पा तुळसकर
मुंबई - वडील -मुलाचे नाते हे नेहमीच तणावपूर्ण आणि संवेदनशील राहिले आहे. अशा या गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील नात्यावर भाष्य करणारी 'बाप बीप बाप' वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यानिमित्ताने 'बाप बीप बाप'च्या टीमशी ईटीव्ही भारतने खास बातचीत केली. अमित कान्हेरे दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये शरद पोंक्षे, शिल्पा तुळसकर, पर्ण पेठे, तेजस बर्वे, उदय नेने हे कलाकार आहेत. या मुलाखतीत त्यांनी विविध मुदद्यांर चर्चा केली आहे.