राज्याचा अर्थसंकल्प निराशाजनक; केंद्राच्याच योजनांचा अर्थसंकल्पात समावेश -फडणवीस - केंद्राकडून येणे आहे. देवेद्र फडणवीस यांची टिका
आज राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक असल्याची टीका केली आहे. केंद्राच्याच योजना राज्याच्या अर्थसंकल्पात समाविष्ट केल्या असल्याची टीका विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केली आहे. अष्टविनायकला रस्त्याने जोडण्याचा कार्यक्रमासाठी मुनगंटीवारांनी आधीच पैसा दिला आहे. चालू कामालाच निधी दिल्याचा आरोप फडणीवस यांनी केला. तसेच कोरोना काळात, रस्तावर राहणारे बेघर, छोटे व्यावसायिक, मजूर वर्गाला राज्य सरकारकडून विशेष पॅकेज देण्यात आले नाही. इंधन दर वाढी २७ रुपयाचा कर कमी केला नाही, गुजरात पेक्षा महाराष्ट्रात १० रुपयांनी महाग आहे. ते केवळ राज्याच्या करामुळे. त्यामुळ राज्यसरकारला आता इंधन दर वाढीवर बोलण्याचा अधिकार नाही. महिलांसाठी काही योजनांचे स्वागत , पण काही विशेष तरतूद करण्यात आला नाही. एकूणच ज्या बजेटमध्ये अपेक्षा ती पूर्ती झाली नाही होती. नागरीभागासाठी नवीन आरोग्य सुविधासंदर्भातील निर्णय चांगला असल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. मात्र, राज्यासाठी कोणतीही नवीन योजना सुरू नाही, पायाभूत गुतवणूक नाही. आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागासाठी एकही नवी योजना राज्य सरकारने केली नाही. शेतकरी, बेरोजगार तरुण, मागासवर्गीय या सर्वांसाठी हा अर्थसंकल्प निऱाशाजन्यक आहे. शिवाजी महाराजांच्या स्मारकांसाठी न्यायालयाची स्थगिती मात्र, या स्मारकांचा सरकारला विसर पडला आहे. शिवस्मारक, इंदू मिल स्मारक, अण्णाभाऊ साठे, लहूजी वस्ताद साळवे यांच्यास्मारकांचाही विसर पडला असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली.