मंदिरं उघडण्याचा निर्णय दिवाळीनंतर? ऐका, आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले.. - Ganeshotsav
जालना - मंदिर उघडण्याबाबतचा निर्णय हा मुख्यमंत्री घेतील. सध्या गणेशोत्सव, गौरी आणि यानंतर बरेच सण-उत्सव आहेत, त्यानंतर दिवाळी देखील आहे. या सणामध्ये दिवाळीनंतरही कोरोनाची आकडेवारी वाढली नाही तर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अहवालानंतर मुख्यमंत्री मंदिर उघडण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. ते जालना येथे आयसीआयसीआय बँकेमार्फत सीएसआर फंडातून जालना जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या अत्याधुनिक दोन फिरत्या रुग्णालयांचे लोकार्पण मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री टोपे हे बोलत होते.