चिपी विमानतळाचा अडीच किमीचा रनवे साडेतीन किमीचा करणार - अजित पवार - कोकणचा विकास
सिंधुदुर्ग - चिपी विमानतळाचा इतिहास मोठा आहे. कोकणाला निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. या विमानतळाचा अडीच किमीचा रनवे आहे. याच्या बाजूला मोकळी जागा असून तो साडेतीन किमीचा होऊ शकतो. असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या वेळी अजित पवार यांनी मत व्यक्त केले. याचबरोबर महामार्गाला येणाऱ्या अडचणीही सोडवू. गोव्याला जाणारा महामार्ग सुरू झाल्यावर प्रवाशांची गैरसोय टळेल. आणि असेही ते यावेळेस म्हणाले. गडकरींनी महाराष्ट्राला मोठी मदत केली आणि मुख्यमंत्र्यांसोबत बोलून आम्ही चर्चा करू आणि त्याची आर्थिक जबाबदारीही उचलू असेही त्यांनी प्रतिपादन केले. या उद्घाटनाच्या वेळेस मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रामदास आठवले तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे उपस्थित होते.