..तर मी आज गावातल्या मारुतीच्या पारावर हरिपाठ म्हणत बसलो असतो - रावसाहेब दानवे - जालना लेटेस्ट न्यूज
जालना - राजकीय नेते लोकांमधून निवडून आल्यानंतर बदलतात मात्र मी सतत लोकांमध्ये राहतो आणि त्यांच्यासारखेच वागतो. म्हणून सातत्याने ४० वर्ष एकही निवडणूक न हारता निवडून येत आहे, त्यांनी मला निवडून दिले नसते तर मी आज मी आज मारुतीच्या देवळात हरिपाठ म्हणत बसलो असतो, अशा विनोदी शैलीत रावसाहेब दानवे यांनी मतदारांचे आभार व्यक्त केले आहेत. गुरुवारी भाजपची जनआशीर्वाद यात्रेप्रंसगी ते बोलत होते. माझा हनिमून आधीच झालाय, त्यामुळे मला शपथ घेण्याची गरज पडली नाही- दानवे भागवत कराड मंत्रीमंडळात नुकतीच वर्णी लागली आहे. त्याच्या विषयी बोलताना दानवे म्हणाले, भागवत कराड नवीन चेहरा असल्याने त्यांच्या मांडव परतण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मात्र मी केंद्रीय मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा मंत्री झालो आहे. त्यामुळे माझा हनिमून आधीच झाला असल्यानं मला शपथ घेण्याची गरज पडली नसल्याचे वक्तव्य केले. त्याच्या या वक्तव्याने सभास्थळी हशा पिकल्याचे चित्र पाहायला मिळाले. मला कोळसा खातं मिळाल्याने सकाळीच उठून मी तोंडावरून हात फिरवून पाहिला. तोंड काळं तर झालं नाही ना? गालावरून हात फिरवून पाहायचो.. मात्र मोदींच्या मंत्रिमंडळात भ्रष्टाचार होत नाही त्यामुळे तोंड काळ व्हायचा प्रश्नच नसल्याचेही त्यांनी यावेळी जनतेला ठासून सांगितले. माझा हनिमून आधीच झालाय, त्यामुळे मला शपथ घेण्याची गरज पडली नाही- दानवे भागवत कराड मंत्रीमंडळात नुकतीच वर्णी लागली आहे. त्याच्या विषयी बोलताना दानवे म्हणाले, भागवत कराड नवीन चेहरा असल्याने त्यांच्या मांडव परतण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मात्र मी केंद्रीय मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा मंत्री झालो आहे. त्यामुळे माझा हनिमून आधीच झाला असल्यानं मला शपथ घेण्याची गरज पडली नसल्याचे वक्तव्य केले. त्याच्या या वक्तव्याने सभास्थळी हशा पिकल्याचे चित्र पाहायला मिळाले. मला कोळसा खातं मिळाल्याने सकाळीच उठून मी तोंडावरून हात फिरवून पाहिला. तोंड काळं तर झालं नाही ना? गालावरून हात फिरवून पाहायचो.. मात्र मोदींच्या मंत्रिमंडळात भ्रष्टाचार होत नाही त्यामुळे तोंड काळ व्हायचा प्रश्नच नसल्याचेही त्यांनी यावेळी जनतेला ठासून सांगितले.