पालघर : नागझरी येथे तीन वाहनांचा अपघात; पाच जखमी - important news
पालघर - बोईसर-चिल्हार मार्गावर दोन टेम्पो व कारच्या विचित्र अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टेंपोच्या धडकेत कारचा पूर्ण चुराडा झाला आहे. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून जखमींमध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे. टेम्पो खाली कार अडकल्याने कारमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. स्थानिक तसेच जेसीबीच्या सहाय्याने कार व टेम्पो बाजूला करण्यात आले. आणि कारमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींना लाईफलाईन या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.