महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Budget 2022 Expectations : अर्थसंकल्पाकडून नोकरदार वर्गाच्या काय आहे अपेक्षा ? - नाशिक नोकरदारांच्या अपेक्षा

By

Published : Jan 30, 2022, 8:33 PM IST

नाशिक - कोरोना महामारीचा नोकरदार वर्गाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेक नोकरदारांना पगार कपातीचा सामना करायला लागला. सरकारने नोकरदार वर्गाला दिलासा देणारे निर्णय अर्थसंकल्पात ( Budget 2022 Expectations ) घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 2022 वर्षात पगारदार वर्गाला स्टॅंडर्ड डिक्शनमध्ये (Standard Diction) सूट मिळण्याची अपेक्षा आहे. स्टॅंडर्ड डिक्शन मर्यादा 50 हजारावरून कमीत कमी 75 हजार करण्याची गरज असल्याचे नोकरदार वर्गाने म्हटलं आहे. वर्क फॉर होम ही संकल्पना नोकरदार वर्गाला महाग ठरली आहे. घरातून काम करणाऱ्या व्यक्तींना इंटरनेट आणि वीज बिल अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे गेल्या तीन वर्षांपासून पगार वाढ झाली नाही. आरोग्य विमा उत्पादनावर सध्या असलेल्या 18% जीएसटी पाच टक्के वर आला तर अधिक जण आरोग्य विमा खरेदी साठी प्रोत्साहित होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. घरावरील,वाहनांवरील व्याज दर कमी व्हावे अशी अपेक्षा नोकरदारांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details