छटपुजेला येणाऱ्या भाविकांची कोरोना चाचणी आणि लसीकरण; मुंबई महापालिकेचा निर्णय - etv bharat live
मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाच्या दोन लाटा थोपविण्यात पालिकेला यश आले आहे. मात्र, त्यानंतरही तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने १० व ११ नोव्हेंबर रोजी समुद्र किनारी छटपुजा करण्यास बंदी घातली आहे. कृत्रिम तलाव, खुली आणि बंदिस्त सभागृहाच्या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत पूजा करावी, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. कृत्रिम तलावाच्या ठिकाणी भाविकांची अँटीजन व आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. समुद्र किनारी पूजेच्या ठिकाणी लसीकरण मोहीम राबवण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याची माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली आहे