Video: अमित ठाकरेंनी नाशकात फुटबॉल खेळत घालवला राजकीय शीण - मनसे
नाशिक - मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे नाशिक दौर्यावर आहेत. शासकीय विश्रामगृहावर मुक्कामी असलेल्या अमित ठाकरे यांनी शनिवारी दिवसभर पक्षीय बैठका घेतल्या. सायंकाळी विश्रामगृहासमोरील मैदानावर त्यांनी फुटबॉलचा आनंद घेतला. अमित ठाकरे यांच्यावर लवकरच नाशिकच्या महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा रंगत आहे. ते नाशिकच्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचेच यातून दिसतेय. शहरातील युनायटेड स्पोर्टस अकॅडमीच्या खेळाडूंसोबत मनमुराद फुटबॉल खेळत त्यांनी राजकीय शीण घालवला, यावेळी अमित ठाकरे यांचे राजकीय पलीकडचे रूप पाहून मनसेसैनिक देखील सुखावल्याचे दिसून आले.