रिलायन्सचे शेअर वधारूनही सलग दुसऱ्या दिवशी मुंबई शेअर बाजारात पडझड - Sensex today news
मुंबई - सलग दुसऱ्या दिवशी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. कोरोनाची ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली लसीची चाचणी थांबविण्यात आल्याने गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दिवसाअखेर मुंबई शेअर बाजार निर्देशांकात १७१.४३ अंशांची घसरण होऊन निर्देशांक ३८,१९३.९२ वर स्थिरावला.