अर्थसंकल्प २०२० : कृषी क्षेत्राला हवी आहे अधिक गुंतवणूक - भारतीय अर्थसंकल्प
नवी दिल्ली - कृषी क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आपण जे अन्न खातो अथवा जे कपडे परिधान करतो, अशा गोष्टी शेतीमधून मिळतात. देशातील एकूण लोकसंख्येपैकी ५० टक्के लोकसंख्या ही कृषीवर अवलंबून आहे. तरीही कृषी क्षेत्राचे अर्थव्यवस्थेमधील योगदान कमी होत आहे.