श्रावणी आरंभ : विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात सुंदर फुले व पानांची आरास - विठ्ठल मंदिर
श्रावण महिन्यातील पहिला सोमवाराच्या निमित्ताने आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हरिहर प्रतिकृती साकारण्यात आली होती. मात्र, परंपरेनुसार विठ्ठल मंदिरात हरिहर नाही, भेद प्रतिकृती मानली जाते. ही सजावट मुंबई येथील मनजुला हुन्नूर यांनी तयार केली आहे. यामध्ये ऑर्केट, लॉडो, शेवंती, कामिनी, सॉगॉप, ड्रीसिनी, जिस्नी यांच्यासह 700 किलो फुलांची आरास केली.