५६ वा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा; कलाकारांच्या प्रतिक्रीया - john bailey
मुंबईतील वरळी येथील 'नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया' येथे ५६ वा मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा अतिशय दिमाखदार पद्धतीने काल (२६ मे) पार पडला. या सोहळ्याच्या निमित्ताने ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली पहिल्यांदाच भारतात आले होते. या सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. आपल्या कामाची नोंद घेऊन राज्य शासनाने आपल्याला पुरस्कार दिला याचा अत्यंत आनंद झाल्याचे सर्व पुरस्कारार्थींनी यावेळी आपल्या मनोगतात व्यक्त केले.