VIDEO : तरुणाला होळीमध्ये ढकलत हत्येचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल - बिहार होळी हत्या व्हायरल व्हिडिओ
पाटणा : बिहारच्या वैशालीमध्ये असणाऱ्या गोरीगामा गावातील एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये एका युवकाला जिवंत जाळण्याच्या उद्देशाने पेटत्या होळीमध्ये ढकलून दिल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. ही दृष्य पाहून कोणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. या आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याला तुरुंगातही पाठवण्यात आले आहे. तसेच, आगीत ढकलण्यात आलेल्या व्यक्तीचे प्राणही वाचले आहेत, मात्र तो गंभीर जखमी झाला आहे...