छत्तीसगड: मिस कॉल द्या, आणि मोबाईलवरू शिका, युनिसेफच्या मदतीनं उपक्रम सुरू
रायपूर - लॉकडाऊनमुळे देशातील सर्व शाळा महाविद्यालये बंद आहेत. अशा परिस्थितीत मोबाईलवरून शिकण्याची संधी युनिसेफने विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी 08033094243 हा टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आला आहे. त्यावर मिस कॉल दिल्यानंतर विद्यार्थ्यांना गोष्टी ऐकताही येतात तसेच पाहताही येतात. प्राथमिक शिक्षणावर या उपक्रमातून भर देण्यात आाल आहे. या कार्यक्रमाला 'सीख' असे नाव देण्या आले आहे.