VIDEO हंगामातील पहिल्या बर्फवृष्टीने गुलमर्गमध्ये लावली हजेरी
बारामुल्ला (श्रीनगर)- हंगामातील पहिल्या बर्फवृष्टीने गुलमर्गमध्ये हजेरी लावली आहे. उत्तर काश्मीरमध्ये पर्यटकांचे आवडते स्थान असलेल्या गुलमर्गमध्ये बर्फवृष्टी झाली आहे. सपाट पृष्टभाग असलेल्या ठिकाणी पाऊस झाला आहे. हवामान विभागाच्या संचालक सोनम लोटस यांच्या माहितीनुसार १२ ऑक्टोबरपर्यंत खराब हवामान राहणार आहे. बर्फवृष्टीमुळे काश्मीरच्या खोऱ्यात रात्रीचे तापमान कमी झाले आहे. बर्फवृष्टीनंतर गुलमर्गमध्ये उणे १ अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नीचांकी नोंद झाली आहे. १३ ऑक्टोबरनंतर हवामानात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.