पोलिसांची 'हार्ट पेशंटला' अमानुष मारहाण; घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.. - Heart Patient beaten in curfew
भोपाळ : मध्य प्रदेशच्या छतरपुर जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या अमानुष वागणुकीचा प्रकार समोर आला आहे. कोविडच्या नियमांचे पालन केले नाही, म्हणून एका हृदविकाराच्या रुग्णालाच पोलिसांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. दूध घेण्यासाठी बाहेर पडलेल्या या व्यक्तीने पोलिसांना हे सांगण्याचाही प्रयत्न केला, की आपण हार्ट पेशंट आहोत. मात्र, तरीही पोलिसांनी त्याला मारहाण सुरुच ठेवली. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे...