'लेफ्टनंट नितीका कौर ढोंडियाल'; शहीद पतीचा वारसा चालवणारी वीरांगणा - नितिका विभूती ढौंडियाल
14 फेब्रुवारी 2019ला जम्मू-कश्मीरच्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 18 फेब्रुवारीला सर्च ऑपरेशनदरम्यान वीरमरण आलेल्या मेजर विभूती ढौंडियाल यांची पत्नी आहे नितिका. एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतात. नोकरी सोडून डिसेंबर २०१९ मध्ये अलाहाबादमध्ये महिला स्पेशल एंट्री स्कीमची परिक्षा दिली. स्क्रीनिंग, ग्राउंड, वैद्यकीय चाचणी,मानसिक चाचणी आणि मुलाखत पार केल्यानंतर नितीकाने चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकेडमी (ओटीए)मध्ये प्रशिक्षण घेतले. 29 मे रोजी प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, नितीका लेफ्टनंट म्हणून सैन्यात रुजू झाल्या. ओटीए चेन्नईमध्ये शेवटचे मार्चिंग केल्यानंतर नितिका कौल ढोंडियालचे लेफ्टनंट बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले.