महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

बिष्णूपूरचे प्रसिद्ध कंदील आणि लोप पावत चाललेली प्रसिद्ध 'दशावतार' कार्ड लोककलेबाबत जाणून घ्या...

By

Published : Oct 24, 2020, 6:03 AM IST

बिष्णूपूर (पश्चिम बंगाल) - दशावतार कार्ड्सना पहिल्यांदा बंगालमध्ये राजा बिरहंबीच्या कारकिर्दीत तयार करण्यात आले होते. राजा बिरहंबी एकदा मोगल सम्राट अकबरच्या भेटीस गेले होते तेव्हा पहिल्यांदा त्यांनी काही कार्ड्स तिथे पाहिले. दिल्लीवरुन परतल्यानंतर राजा बिरहंबीनंही विष्णूच्या दशावतारातील कार्ड बनवण्याचे आदेश दिले. या शाही घराण्याशी एकनिष्ठ असलेले कुटुंब आजही दशावतार कार्ड बनवत आहेत. यासोबतच एकेकाळी बिष्णूपूरचे कंदील संपूर्ण देशात प्रसिद्ध होते. परंतु, जसजशी इलेक्ट्रिक लाइट्सची संख्या वाढत गेली तसतशी कंदीलची मागणी घटू लागली आणि कारागिरांचा व्यवसाय ठप्प झाला. म्हणूनच आज कंदीलचे आधुनिकीकरण करत त्यावर दशावतार कार्ड्स रंगवले जाऊन या कलेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details