VIDEO : टीकरी सीमेला घर बनवलेल्या आंदोलक शेतकऱ्यांसाठी खास मॉल
चंदीगढ - केंद्रीय कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर मागील ३० दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कडाक्याच्या थंडीत शेतकरी निर्धारानं आंदोलन पुढे नेत आहेत. हजारो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांनी सिंघू आणि टीकरी सीमेला आपलं घर बनवलं आहे. स्वयंपाक बनवण्यापासून सिंघू आणि टीकरी सीमेवर आता शेतकऱ्यांसाठी खास मॉलही सुरू झाला आहे. यामधील सामान शेतकऱ्यांना टोकनद्वारे मोफत मिळत आहे. साबण, चपला, तेल, गरम कपडे या मॉलमध्ये उपलब्ध आहेत. एका स्वयंसेवी सस्थेनं हा मॉल सुरू केला आहे. पाहा व्हिडिओ..