PM Modi Kashi Tour Midnight : पंतप्रधानांनी मध्यरात्री केली 'बनारस की गलियोंकी सैर'; पाहा व्हिडिओ - PM MODI Tweet
बनारस (उत्तरप्रदेश) - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोमवारी विश्वनाथ धाम कॉरिडोरचे लोकार्पण ( kashi vishwanath dham corridor ) केले. त्यानंतर त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सह रात्री 8 वाजता गंगा आरती केली. त्यानंतर ते आपल्या गेस्ट हाउस वर गेले. रात्री दिड वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी बनारस मधिल विविध स्थळांना भेटी ( PM modi Kashi Darshan at midnight ) दिल्या. यावेळी त्यांनी मध्यरात्री रेल्वे स्टेशनचीही पाहणी ( pm narendra modi inspected at midnight ) केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, "आम्ही रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी तसेच स्वच्छ, आधुनिक आणि प्रवासी अनुकूल रेल्वे स्थानके सुनिश्चित करण्यासाठी काम करत आहोत."