VIDEO : दिल्ली-हरयाणा सीमेवर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन - दिल्ली मार्च बातमी
केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांचे राजधानी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिली आहे. मात्र, आंदोलनाच्या ठिकाणावरून पोलीस आणि शेतकरी आमनेसामने आले आहेत. दिल्ली हरयाणाच्या मधील टीकरी आणि सिंघू सीमेवर शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. शेतकरी बरोबर येताना राशन घेवून आले असून कितीही वेळ थाांबण्याची वेळ आली तरी तयार आहेत. जंतरमंतर मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी शेतकरी अडून बसले आहेत. मात्र, बुरारी येथे निरंकारी मैदानावर शेतकऱ्यांनी आंदोलन करावे, असे पोलिसांनचे म्हणणे आहे. ईटीव्ही भारतने शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे म्हणणे जाऊन घेतले आहे. पाहा व्हिडिओ